वाशी : जीप झाडाला धडकून विहिरीत पडल्याने एकाच मृत्यू 

 
crime

वाशी   - वाशी  येथील- शंकर बाळासाहेब बोरकर वय 25 वर्ष हे दि.13.01.2023 रोजी 20.00 वा.सु. पिंपळगाव लिंगी येथे जीप क्र एमएच16 सी 7396 चालवत जात होते. यावेळी शंकर यांनी जीप निष्काळजीपने चालवल्याने जीपीवरील नियंत्रण सुटल्याने सदर जीप ही झाडाला धडकून विहिरीत पडल्याने शंकर हे पाण्यात बडून मयत झाले. अशा मजकुराच्या वाशी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- बळीराम यादव यांनी सरकारतर्फे दि. 18.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

बेंबळी  : चिखली, ता. उस्मानाबाद येथील- किशोर जाधव यांनी दि. 18.01.2023 रोजी 16.10 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मॅजिक क्रं. एम.एच.13 एझेड 5626 हे वाहन ढोकी तुळजापुर रोडवर चिखली येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना बेबंळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

लोहारा : सास्तुर, ता. लोहारा येथील- गौशपाशा शेख यांनी दि.18.01.2023 रोजी 10.30 वा.सु.ॲपे टमटम  क्र. एम.एच. 23 एक्स 2784 हा सास्तुर ते बलसुर जाणारे रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभा केला असताना लोहारा पोलीसांना आढळले.

बेंबळी महाळंगी, ता. उस्मानाबाद येथील- तानाजी तांबे,अकलाक शेख या दोघांनी दि.18.01.2023 रोजी 16.50 ते  17.25 वा.सु.आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे टाटा मॅजिक क्र. एम.एच. 13 एसी 8929 व मॅगझीमा गाडी क्र. एम.एच. 25 एके 1184 ह्या ढोकी ते तुळजापुर जाणारे रस्त्यावर महाळंगी चौकात रहदारीस धोकादायरीत्या उभा केलेल्या असताना बेबंळी पोलीसांना आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत पोलीस ठाणे लोहारा येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web