वाशी : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
वाशी : ईट,ता.भूम येथील- दिप्ती निलेश भोसले हिने दि.28.12.2022 रोजी 03.00 वा.सु. गावातील आपल्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ईट येथील- निलेश महोन भोसले (पती), महोन दगडू भोसले, पवित्रा महोन भोसले यांनी मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर घेण्यासाठी सुन- दिप्ती हिच्याकडे पैशे मागणीचा तगादा लावला होता.
या त्रासास कटाळूंन दिप्ती हिने विषारी औषध प्राशन करून आत्महात्या केली. अशा मजकुराच्या मयेतेची आई- पिंगलबाई वखाऱ्या काळे,रा. सामनगाव, ता. भूम यांनी दि.30.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
नळदुर्ग : रहीमनगर, नळदुर्ग येथील- फुलचंद धनू पवार, सुशिलाबाई फुलचंद पवार हे दि.30.12.2022 रोजी 10.25 वा.सु. गावातील आपल्या घरासमोर अंदाजे 48,000 ₹ किंमतीची 600 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.