वाशी : निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल 

 
crime

वाशी  : बीड, येथील अब्दुल गणी फाहद यांनी दि. 29.04.2022 रोजी 02.00 वा. सु. पारा चौक, वाशी येथील सार्वजनिक रस्थ्यावर माजवाहु मिनी ट्रक क्र. एम.एच. 1 टी 2073 हा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोउपनि- श्री पवन निंबाळकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : माणकेश्वर, ता. भूम येथील मुन्ना तुकाराम निकम यांनी दि. 29.04.2022 रोजी 01.00 वा. सु. माणकेश्वर गावातील रस्त्यावर ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 15 बीएन 9589 हा निष्काळजीपने चालवून चालक- शिवाजी सुभाष सानप हे चालवत असलेल्या एसटी बसला समोरुन धडक दिल्याने यात बसचे आर्थिक नुकसान झाले. यावरुन शिवाजी सानप यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

भूम  : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. चे अधिकारी- कुलदीप काशीनाथ आडे हे आपल्या पथकासह दि. 29.04.2022 रोजी 15.15 वा. सु. भुम शिवारातील वालवड येथील गट क्र. 208 मध्ये कंपनीच्या पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम करत होते. यावेळी वालवड ग्रामस्थ- अण्णासाहेब बाळासाहेब मोहिते, बाळासाहेब मोहिते, भाउसाहेब मोहिते या सर्वांनी तेथे जाउन कामावरील कंत्राटी कामगार यांना दमदाटी करुन काम करण्यास परावृत्त केले. तसेच पथकाच्या शासकीय कामात अडथळा करुन कामावरील वाहनांची अडवणूक केली. यावरुन कुलदीप आडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 341, 504, 34 सहे पेट्रोलियम आणि खनीज पाईपलाईन अधिनीयम कलम- 15 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web