वाशी : सुनेवर बलात्कार केल्याचा आरोप, सासऱ्याला जामीन मंजूर
औरंगाबाद - सुनेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एका सासऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमीत जामीन केला मंजूर.केला आहे .
दि. 17/06/2022 रोजी पिडीत विवाहित महिलेने वाशी पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली की , तीचे लग्न सात वर्षे पुर्वी झालेले असुन तीला दोन अपत्ये आहेत. ती एकत्र कुटुंबात राहाते. दि 17/06/2022 रोजी ती झोपेत असताना पहाटे पाच वाजता तिच्या सासरे घरत आले व तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. तीच्यावर तिच्या मनाविरुद्ध मागील सहा महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केला जातो व त्यास घरातील ईतर सदस्य पती, दीर, सासु, अजत सासु यांचा पाठिंबा आहे.
सदर आशयाची तक्रार दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी अटक झाली त्यापैकी इतर आरोपींना . जिल्हा न्यायालय, भुम यांनी नियमित जामिन मंजूर केला व मुख्य आरोपीचा जामीन नामंजूर केला. मुख्य आरोपीने ॲड. सुशांत बाबुराव चौधरी यांच्या मार्फत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठासमोर नियमीत जामीन मिळने साठी अर्ज सादर केला. उच्च न्यायालयाने दि 06/10/2022 रोजी सरकारी वकिलांमार्फत वैद्यकीय अहवाल मागवला असता वारंवार संधी देऊन ही सादर न केल्याने अखेर दि. 20/01/2023 रोजी जामीन सुनावनीस घेण्यात आला.
आरोपी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की आरोपी हा आपले आई-वडील व दोन मुलांसह दोन खोल्यांच्या घरात राहातो व पिडीत सुन ही गेल्या काही महिन्यांपासून विभक्त राहनेसाठी दबाव टाकत होती व त्यावरुन वारंवार कौटुंबिक कलह होत. शेवटी त्या कलहाचे रूपांतर सदरील खोटा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात येऊन उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे ॲड. सुशांत बाबुराव चौधरी यांनी काम पाहिले.