भूम तालुक्यातील खुनाचा अवघ्या 24 तासात उलगडा

 
crime

भूम : पोत्यात पाय बांधलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह  भुम तालुक्यातील सोनगिरी तलावातील पाण्यात दि. 21 मार्च रोजी सायंकाळी आढळला होता. या  मृतदेहाची ओळख पटवणे पोलीसांना आव्हान बनले असताना भुम पेालीसांनी 24 तासात त्या मृतदेहाची ओळख पटवली असुन हा मृतदेहाची मांडवा ता.भुम येथील युवराज त्रिंबक पाटील, वय-45 वर्ष, यांचा असल्याचे पोलीसांनी निष्पन्न केले. 

गावकरी निलेश काळे यांनी जुना वैमनस्यातुन युवराज यांचा गळफास देऊन  खुन केला असुन पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तलावात मृतदेह फेकला आहे. अशा मजकुराची प्रथम खबर मयताचे पुतने- दत्तात्रय  पाटील यांनी दि.22 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 302,201 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

पिस्टलसह दोघे आरोपी अटकेत

उस्मानाबाद   : उस्मानाबाद येथील जुना बस डेपो परिसरातील सुनिल काळे व दत्ता काळे हे दोघे एक पिस्टल अवैध्‍ पणे बाळगुण आहेत अशा स्वरुपाची गोपनीय माहीती स्थागुशाच्या सपोनि-निलंगेकर, पवार यांसह पोउपनि- माने, पेालीस नाईक- सययद, चव्हाण, टेळे,  मारलापल्ले यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने काल दि.22 मार्च रोजी त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात एका गावठी पिस्टल सह  एक जिवंत काडतुस अवैधपणे बाळगलेले आढळले. यावरुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे शस्त्र कायदा कलम 3,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web