उमरेगव्हाण : मद्यधुंद अवस्थेतील भावाचा भावाकडून खून 

 
crime

बेंबळी  : उमरेगव्हाण, ता. उस्मानाबाद येथील वैभव दत्तात्रय गवळी, वय 27 वर्षे यांनी दि. 25 मे रोजी दिवसभर मद्यधुंद अवस्थेत आई- लक्ष्मी, भाऊ- पांडुरंग तसेच इतर शेजारी व पाहुणे यांना फोनद्वारे व समक्ष शिवीगाळ केली.

 वैभव हा रात्री 20.30 वा. सु. उमरेगव्हाण येथील दिपक थेटे यांच्या ढाब्याजवळ असल्याने भाऊ- पांडुरंग हे त्यास घरी आणने साठी तेथे गेले असता त्या दोघांत वाद होउन पांडुरंग यांनी भाऊ- वैभव यास काठीने मारहान करुन त्याचा खून केला. अशा मजकुराच्या लक्ष्मी दत्तात्रय गवळी, रा. उमरेगव्हाण यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शरीराविरुध्दचे गुन्हे

उस्मानाबाद  : रेणापूर, जि. लातुर येथील दिनेश गायकवाड, शुभम गायकवाड, कुनाल गायकवाड, माया गायकवाड या सर्वांनी दि. 25 मे रोजी 23.00 वा. सु. जुन्या वादाच्या कारणावरुन भिमनगर, उस्मानाबाद येथील रमा कालीदास लांडगे यांना त्यांच्या राहत्या गल्लीत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रमा लांडगे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web