उमरग्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत
उमरगा : सुनिल जयकर मंडले, रा. तलमोड, ता. उमरगा व सागर कुंडलीक माने, रा. उमरगा या दोघांसह दोन अल्पवयीन मुले (विधी संघर्षग्रस्त बालक) अशा चौघांनी दि. 14.09.2022 रोजी 01.30 ते 02.00 वा. सु. जुन्या वादाच्या कारणावरुन तलमोड येथील- दिपक नामदेव मंडले, वय 19 वर्षे यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामागील बंदपडक्या पत्र्याच्या गुदामात मोटारसायकलवर नेउन नमूद चौघांनी कत्ती, हंटरने दिपक यांच्या डोक्यात, पाटीत, मानेवर वार करुन त्यांचा खून केला. तसेच पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने नमूद चौघांनी दिपक यांचा मृतदेह चटई व पोत्यात गुंडाळून वायरने बांधून तलमोड गावाच्या बाहेर रस्त्याकडे फेकून दिला. अशा मजकुराच्या तलमोड ग्रामस्थ- लखन महादेव मंडले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 491/2022 हा भा.दं.सं. कलम- 302, 201, 34 अंतर्गत नोदवला आहे.
सदर घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी, उमरगा बरकते यांसह उमरगा पो.ठा. ये पोनि- राठोड यांनी घटनास्थळी भेट देउन उमरगा पोलीस ठाण्याचे पथक खूनातील नमूद आरोपींच्या शोधार्थ तात्काळ रवाना केले. पथकास त्या आरोपींचा त्याच्या गावी ठावठिकाणा न लागल्याने पोलीसांनी तांत्रिक तपास करुन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद चौघांना दि. 14.09.2022 रोजी 22.05 वा. म्हणजेच गुन्ह्यानंतर अवघ्या 20 तासांत सोलापूर शहरातून ताब्यात घेतले. त्या चौघातील सुनिल मंडले व सागर माने या दोघांना अटक करुन उर्वरीत दोन अल्पवयीन मुलांना बाल कल्याण मंडळ, उस्मानाबाद येथे हजर केले असता त्यांनी त्या दोघांची रवानगी रिमांड होममध्ये केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि- . रमेश जाधवर हे करत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक. नवनीत काँवत व उमरगा विभागाचे पोलीस उपअधीक्षक- . बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पो.ठा. चे पोनि- मनोज राठोड, सपोनि- रमेश जाधवर, पोहेकॉ-शिवलींग गोलसगाव, दिगंबर सुर्यवंशी, पोना-महेश अवचार,अतुल जाधव,बबीता चव्हाण,पोकॉ सिध्देश्वर उंबरे,बाबा कांबळे,औदुंबर गजभार यांच्या पथकाने केली आहे.
भूममध्ये खून
भूम : विजयनगर, भुम येथील- सचिन त्रिंबक साबळे, दिपक त्रिंबक साबळे, अमोल प्रकाश साबळे या तीघांनी संगणमतकरुन जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 26.11.2022 रोजी 07.00 वा. सु. साबळेवाडी शिवारातील दिपक साबळे यांच्या शेतात शेंडगेगल्ली, भुम येथील- दिगंबर दत्तात्रय शेंडगे, वय 47 वर्षे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केल्याने दिगंबर शेंडगे हे भुम येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 03.12.2022 रोजी 22.20 वा. सु. मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- सागर दिगंबर शेंडगे यांनी दि. 04.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.