उमरगा  तलवार बाळगणा-यावर गुन्हा दाखल

 
crime

उमरगा :  उमरगा  येथील  धन्वंतरी  हॉस्पीटल समोरील रस्त्यावर  दि. 18 मार्च रोजी 20.15 वा उमरगा पोलीसांनी  ॲपे रिक्षा क्रमांक एम एच 24 जे  1868 हा संशया वरुन थांबवला. यावेळी चालक पप्पु कुकरडे  रा.कुन्हाळी हे  रिक्षातुन 55 से मी. लांबीची तलवार अवैध उददेशाने बाळगलेले आढळले.या वरुन पोलीस नाईक अतुल मुकुंद जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम 4,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

आंबी  : सोनारी येथील अश्वीनी बाबासाहेब हंगे व भाउबंद अन्वीता संतोष हांगे या दोन्ही कुटुंबातील  शेतजमीन कसण्याचा वाद  दिनांक 18 मार्च रोजी 11.00 वा सुमारास शेतात उफाळुन आला. यात  दोन्ही कुटुंबातील स्त्री-पुरुषांनी परस्पर कुटुंबीयांस लाथा बुक्यांनी ,काठीने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी परस्प्र विरोधी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम, 143,147,148,149, 324,504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

 

ढोकी  : तेर येथील अखील जमील काझी यांसह त्यांची पत्नी नुसरतजहाँ यांस भाउबंद निहाल काझी , ईलीयास, महमंद, याहया या सर्वांनी  सामुदाईक शेतीच्या वादातुन दिनांक 18 मार्च रोजी 11.00 वा शेतात लाथा बुक्यांनी ,गजाने मारहाण केली.अशा मजकुराच्या अखील काझी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,324,504, 605,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web