उमरगा : गोवंश कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल

 
crime

उमरगा  : उमरगा पोलीस ठाण्याचे पथक दि. 10.07.2022 रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी निमीत्ताने उमरगा शहरात गस्तीस होते. महाराष्ट्रात गोवंशीय जनावराच्या कत्तलीस बंदी असतानाही कोळीवाडा, उमरगा येथे जिंदालाल ईस्माईल शेख यांच्या शेडमध्ये जिंदालाल यांसह गुंजोटी येथील नजीर अब्दुल रशीद कुरेशी, आयुब नजीर कुरेशी हे तीघे संगणमताने 8 सुऱ्या व एक गज याच्या सहायाने एका बैलाची कत्तल करत असताना पथकास आढळले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- बाबासाहेब कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 429, 34 सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम कलम- 55 (ब), 9 आणि शस्त्र कायदा कलम- 4,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्याकडेला हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत कणाऱ्यांवर उस्मानाबाद पोलीसांनी दि. 11 जुलै रोजी कारवाया केल्या. यात परंडा ग्रामस्थ- लखन अरुण काटवटे व बरु अखिल जिन्नेरी या दोघांनी परंडा येथील करमाळा रस्त्याकडेला तर सुकटा, ता. भुम येथील दशरथ बळीराम गलांडे यांनी गावातील बस थांब्यासमोरीलर रस्त्याकडेला आपापल्या हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असताना पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 उस्मानाबाद  : परंडा येथील रंजीत संभाजी गवंडी व रुई ग्रामस्थ- अतुल रामदास मुळीक यांनी  दि. 11 जुलै रोजी 11.30 वा.सु. आपापल्या ताब्यातील ॲपे रीक्षे हे परंडा येथील सार्वजनिक रस्त्यावर तर बेंबळी ग्रामस्थ- सादीक आमीर शेख यांनी 12.10 वा. सु. आपल्या ताब्यातील ट्रक बेंबळी येथील उजणी रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 
 

From around the web