उमरगा :  सार्वजनिक ठिकाणी झुंज खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

 उमरगा  : सेवानगर तांडा, कदेर, ता. उमरगा येथील- जयसिंग राठोड, अविनाश राठोड, अनिल राठोड हे तीघे दि. 31.10.2022 रोजी 22.30 वा. सु. तांडा परिसरात एकमेकांना शिवीगाळ करुन आपापसात झुंज खेळत असताना  उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 160 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 मुरुम  : सुंदरवाडी, ता. उमरगा येथील- नेताजी सुभाष घुले यांनी दि. 01.11.2022 रोजी 10.00 वा. सु. मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर आपल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
उस्मानाबाद  : आनंदनगर पोलीस ठाण्याचे पथक दि. 28.10.2022 रोजी 16.00 वा. सु. मा. जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथील मुख्य प्रवेशद्वार येथे कर्तव्यावर असताना उस्मानाबाद येथील- सोमनाथ गुरव, सचिन शेंडगे, गजेंद्र जाधव, सागर बाराते, प्रविण कोकाटे, गणेश साळुंके, अजित बाकले, संदिप देशमुख, रणजित महाडिक, बाळासाहेब काकडे या सर्वांनी संगणमताने तेथे जाउन मोठमोठण्याने आरडाओरड करुन मुख्या प्रवेशद्वाराच्या गेडला कुलूप लाउन शासकीय कामकाज करण्याकरीता कार्यालयात जाण्यायेण्यास पाबंद केला. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- अमोल कुंभार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 341, 186 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रस्ता अपघात

 ढोकी  : सावरगाव (पु.), कळंब येथील- रमेश नरसिंग धोंगडे, वय 30 वर्षे व आकाश बाळासाहेब सोनवणे हे दोघे दि. 25.09.2022 रोजी 23.30 वा. सु. ढोकी शिवारातील तडवळा रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 2163 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 5326 हा निष्काळजीपने चालवल्याने नमूद मो.सा. ओव्हरटेक करत असताना मो.सा. च्या हॅन्डलला रीक्षचा धक्का लागून मो.सा. घसरली. या अपघातात रमेश धोंगडे हे मयत होउन आकाश हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या पोपट नरसिंग धोंगडे, रा. सावरगाव (पु.), कळंब यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 59/2022 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web