उमरगा : तरुणीला फ्लाईंग किस करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल 

 
crime

उमरगा :  तालुक्यातील एक 16 वर्षीय मुलगी- दि. 4 एप्रिल रोजी 17.30 वा. आपल्या घरासमोर उभी असताना एका तरुणाने तीला इशा-याने खुनवुन हवेतुन चुंबन देउन तीचा विनयभंग केला. या विषयी तीच्या माता-पित्याने त्यास हटकले असता त्या तरुणासह त्याच्या इतर तीन तरुण मित्रांनी त्या मुलीच्या माता-पित्यास शिवीगाळ, धक्का- बुक्की करुन मारहाण केली.अशा मजकुराच्या संबंधीत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 324, 354, 504, 34 तसेच पोक्सेा कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  :  एक 16 वर्षीय मुलीस- दि. 4 एप्रिल रोजी एसएससी परिक्षेसाठी शाळेत सोडुन परिक्षा तीचे पिता शाळेबाहेर तीची वाट पाहत होते.  परीक्षा संपल्यानंतर ती मुलगी न परतल्याने पित्याने तीच्या मैत्रीणीकडे विचारपुस केली असता, ती आपल्या मैत्रीणीस परिक्षेचा पॅड देउन मैत्रीणीकडे जात असल्याचे सांगुण गेल्याचे समजले. यावरुन एखादया अज्ञात व्यक्तीने तीचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे अशा मजकुराच्या तीच्या पित्याने  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 363 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :  कळंब मधील शेरे गल्लीतील श्रीमती अंकीता अशोक चोंदें, वय-22 वर्ष यांनी दि. 4 एप्रिल रोजी आपल्या घरात आत्महत्या केली होती. अंकीता व अशोक यांचा दि. 19 मार्च 2020 रोजी विवाह झाल्यापासुनच अंकीता हीने हुंडयातील बाकी रक्कम माहेरावरुन आणण्यासाठी तीचे पती- अशोक, सासरे- श्रीमंत, सासु- भागुबाई यांनी अंकीता हिचा अनेकदा शारीरिक मानसिक छळ केल्याने या छळास कंटाळुन अंकीता हिने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या अंकीताचे पिता- सुखदेव घाडगे, रा. केज यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 306, 304 ब, 34 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web