एमपीडीए कायद्यांतर्गत कळंब शहरातील दोन महिला स्थानबध्द

 
crime

उस्मानाबाद  -   शेळी बाजार मैदान, कळंब येथील- तोळाबाई शंकर पवार आणि इटकुर, ता. कळंब येथील- जयश्री गोरख शिंदे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम 1981 (MPDA) कलम- 3 (2) चे उल्लंघन केल्याने  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी त्या दोघींना स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. 

सदर प्रस्तावास  जिल्हाधिकारी यांची मंजूरी मिळल्याने  पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव, पोउपनि-  संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, शैला टेळे, महेबुब अरब यांच्या पथकाने आज दि. 07.12.2022 रोजी उपरोक्त दोन्ही महिलांना त्यांच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव कळंब पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 शेतजमिनीवरून तोंडात विषारी औषध ओतले 

नळदुर्ग  : आरळी (बु.), ता. तुळजापूर येथील- एकनाथ नारायण पौळ, वय 40 वर्षे हे दि. 03.12.2022 रोजी 13.00 वा. सु. आरळी (बु.) गट क्र. 684 मधील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- श्रीशैल्य रेवणसिध्द तानवडे यांसह त्यांची मुले- अमोल व सागर अशा तीघांनी एकनाथ यांच्या शेतात जाउन शेतजमीनीच्या मालकी हक्काच्या कारणावरुन एकनाथ यांना पकडून ठार मारण्याच्या उद्देशाने एकनाथ यांच्या तोंडात विषारी औषध ओतून तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या एकनाथ पौळ यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 06.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web