उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : काटगाव गट क्र. 19 मधील शेळी पालन शेडच्या खिडक्या दि. 14 मे रोजी 00.30 ते 05.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून आतमधील पाच विद्युत पंप, एक इनव्हर्टर, एक बॅटरी, पीव्हीसी पाईप, किर्लोस्कर कंपनीचा इंजन व पाच खुर्च्या असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या इमाम नजीर शेख, रा. काटगाव यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : गणेशनगर, उस्मानाबाद येथील बाळु ज्ञानोबा उंबरे यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एबी 3414 ही दि. 09 मे रोजी 13.00 ते 14.00 वा. दरम्यान उस्मानाबाद बस स्थानक येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या उंबरे यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 रस्ता अपघात

ढोकी  : अज्ञात चालकाने दि. 11 मे रोजी 20.30 वा. सु. चव्हाण वस्ती, दुधगाव शिवारातील रस्त्यावर पिकअप क्र. एम.एच. 26 बीई 5528 हा निष्काळजीपने चालवल्याने टाटा एस क्र. एम.एच. 25 पी 5075 ला समोरुन धडकल्याने टाटा एसीई पलटला. या अपघातात टाटा एस मधील प्रवासी- दिनाजी शिंदे, वय 37 वर्षे व राधा भिमा शिंदे, वय 3 वर्षे, रा. गोलेगाव हे मयत होउन अन्य 12 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद पिकअपचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या कमत दिनाजी शिंदे, रा. गोलेगाव यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web