उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  : राजहर्ष मेंढेकर यांच्या आरणी शिवारातील गट क्र. 431 मधील शेत गोठयातील प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. वजनाची 117 पोती सोयादाने अज्ञात व्यक्तीने दि. 1 एप्रिल रोजी चोरुन नेले. अशा मजकुराच्या मेंढेकर यांनी दि. 5 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 306, 304 ब, 34 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

 
तुळजापुर  : शिंगोली ग्रामस्थ – विजय लोंढे हे दि. 5 एप्रिल रोजी 12.30 वाजता हंगरगा फाटा ते तुळजापुर असे टाटा एस वाहन चालवत जात असताना त्यांनी एका अनोळखी प्रवासी महिलेस त्यांच्या वाहनातुन तुळजापुर येथे सोडले. त्यानंतर लोंढे यांनी चालकाच्या आसनामागील आपली पिशवी तपासली असता आतील 5,700 रु रक्कम चोरीस गेली असल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या विजय लोंढे यांनी प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मदय विरोधी कारवाई 

अवैध मदय विरोधी कारवाई दरम्यान पोलीसांनी दि. 6 एप्रिल रोजी तीन ठिकाणी छापे टाकले असता महेश कांबळे हे मोंढयातील पत्राशेडजवळ घागरीमध्ये 15 लिटर गावठी दारु तर तात्यासाहेब कोळेकर बौध्द स्मशानभुमीमागे 2 कॅन मध्ये 19 लिटर गावठी दारु अवैध व्यवसायास बाळगलेले आढळले. घाटंग्री ग्रामस्थ-भागवत बल्लाळ हे स्वत:च्या घरासमोर कॅन मध्ये 10 लिटर गावठी दारु अवैध व्यवसायास बाळगलेले आढळले. यावरुन महाराष्ट्र मदय निषेध कायदा अंतर्गत 3 गुन्हे पोलीसांनी नोंदवले आहेत.

                                                                                   

From around the web