उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

शिराढोण  : जागृती विद्या मंदिर, देवळाली या शाळेच्या कार्यालयातील विविध शालेय अभिलेखे, सेवापुस्तीका, देयके, प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे शाळा कर्मचारी- बाबासाहेब चंद्रकांत बिक्कड यांनी दि. 01.07.2021 ते 17.02.2022 रोजी दरम्यान चोरुन नेली आहेत. तसेच शाळेतील साहित्याची व शाळेच्या कुंपनाची तोडफोड करुन शाळेच्या आवारातील झाडे तोडून नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या शाळा मुख्याध्यापिका- श्रीमती मिरा लक्ष्मणराव जाधवर यांनी दि. 20.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग : महादेव चंद्रकांत मनुरे, रा. सोलापूर यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीवाय 3141 ही दि. 12- 13.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री फुलवाडी, ता. तुळजापूर येथील त्यांचे मामा- काशिनाथ हांडगे यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या काशिनाथ हांडगे यांनी दि. 20.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
विनयभंग

उस्मानाबाद  : एक तरुण गावातीलच एका 19 वर्षीय मुलीचा (नाव- गाव गोपनीय) मागील सहा महिन्यांपासून वेळोवेळी पाठलाग करत होता. ती मुलगी दि. 20.02.2022 रोजी 09.30 वा. सु. घरासमोर असतांना त्या तरुणाने तीच्याजवळ येउन तीचा हात धरुन, “ तु मला फार आवडतेस, आपण दोघे पळून जाउन लग्न करुन.” असे म्हणुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या त्या मुलीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 509 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web