उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

वाशी  : भूम येथील सुमैया अहमद मनियार या दि. 05.02.2022 रोजी 13.30 ते 14.00 वा. दरम्यान सरमकुंडी फाटा येथील ‘यशोदा हॉटेल’ समोर उभ्या होत्या. यादरम्यान सुमैया यांच्या पर्समधील 72,500 ₹ त्यांच्या नकळत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुमैया मनियार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील राधोशाम विष्णुदास बजाज यांच्या शहरातील तुळजाभवानी शॉपींग सेंटर कॉम्पलेक्स मधील एशियन पेंटचे गुदामाचे कुलूप दि. 16- 25.01.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने बनावट चावीने उघडून आतील एशियन पेंटचे 20 लिटरचे 39 डबे चोरुन नेले. अशा मजकुराच्या राधेशाम बजाज यांनी दि. 05.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
फसवणूक

परंडा  : शिराळा, ता. परंडा येथील ग्रामस्थ- लक्ष्मण गुंडीबा कदम यांनी आपली शेत जमीन तारण ठेउन परंडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून 7,50,000 ₹ रकमेचे पीक कर्ज घेतल्याने त्या कर्जासह व्याजाची रक्कम 16,11,501 ₹ त्यांच्याकडे बाकी होती. सदर जमीन तारण असतांनाही त्यांनी 29.01.2022 रोजी मुलगे- अमोल, राहुल, सुनिल, अजित, यांसह विजया लक्ष्मण कदम यांच्या नावे केली. त्यानंतर नमूद जमीनीवर नमूद वारसांनी एचडीएफसी बँक, बार्शी या शाखेतून 6,20,000 ₹ कर्ज घेतले. अशा प्रकारे लक्ष्मण कदम यांनी तारण शेत जमीनीची बँकेच्या संमती शिवाय परस्पर वारसांस वाटणी करुन बँकेची फसवणूक केली. अशा मजकुराच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक- भारत भोसले यांनी दि. 05.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लक्ष्मण कदम यांच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web