उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे 

 
crime

तामलवाडी  : काटी येथील राहुल भानवसे यांची युनिकॉर्न मोटार सायकल क्र. एम.एच.12 सी.झेड 4523 ही दि.20-21 मार्च दरम्याणच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन चोरीस गेली आहे. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : कोंढ  येथील उत्त्रेश्वर शेटे यांच्या  घराच्या मागील दरवाजाची आतील कडी दि.21 मार्च रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने उघडुन कपाटातील 64 ग्रॅम सुवर्ण दागिण्यासह 65,000 रु रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या उत्त्रेश्वर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 457,380 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

 
 मारहाण

शिराढोण  : देवधानोरा येथील यशोदा बोंदर यांना दि.20 मार्च रोजी 22.00 वाजता त्यांचा मुलगा रामेश्वर यांनी मदय धुंद अवस्थेत शिवीगाळ करुन चुलीतील लाकडाने मारहाण केल्याने त्यांचा उजव्या हाताचे हाड मोडुन डोक्यास जखम झाली. अशा मजकुराच्या यशोदा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,326,504, 605,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web