ढोकीत अटक आरोपींकडून चोरीच्या दोन  मोटारसायकल जप्त 

 
s

ढोकी  : म्होतरवाडी येथील खंडु पाडोळे यांची टीव्हीएस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 1501 व तेर ग्रामस्थ- गोविंद बबन माने यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एफएन 6503 अशा दोन मोटारसायकल दि. 25 जुलै रोजी दुपारी तेर येथील साप्ताहीक बाजारातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या खंडु पाडोळे यांच्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 249 /2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.

 ढोकी येथील साखर कारखाना परिसरातील साहित्य चोरी तपासात ढोकी पोलीसांनी दि.02 ऑगस्ट रोजी संतोष अर्जुन लष्कर, रा.वडरवस्ती, ता.केज जि.बीड व शिवाजी ऊर्फ राहुल रमेश दळवी, रा.क्रांतीनगर, ता.केज,‍जि.बीड यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता दि. 25 जुलै रोजी तेर साप्ताहीक बाजारातून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकल त्यांनीच चोरल्याचे समजताच पथकाने त्या मोटारसायकल त्यांच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.  

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक . नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- जगदीश राऊत, पोलीस अंमलदार- राठोड, तर्टे, क्षिरसागर, गोडगे यांच्या पथकाने केली आहे.

From around the web