उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी 

 
crime

वाशी  : चौसाळा, ता. जि. बीड येथील- अंकेत अशोक पवार, वय 27 वर्षे हे दि. 18.12.2022 रोजी 00.30 वा. सु. इंदापुर फाटा येथील रस्त्यावर असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या अक्षय पवार यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लोहारा  : कसगी, ता. उमरगा येथील- मल्लीनाथ शिवाजी कलशेट्टी हे दि. 22.11.2022 रोजी 12.25 वा. सु. जेवळी (दक्षिण) येथील रस्त्यावरील उड्डान पुलावरील रस्त्याने स्विफ्ट कार क्र. एम.एच. 25 आर 3905 ही चालवत जात होते. दरम्यान ती कार कलशेट्टी यांनी निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन उड्डान पुलावरून पलटी होउन खाली पडली. या अपघातात कारमधील प्रवासी कसगी येथील- महेश निलकंठ दोडमणी हे मयत होउन मल्लीनाथ यांसह सुदिप गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या प्रमोद राजेंद्र सोनकांबळे, रा. कसगी यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शेतजमीनीच्या वाटणीवरुन मारहाण 
 

 शिराढोण   : मंगरुळ येथील- मधुकर रितापुरे, वय 55 वर्षे हे दि. 21.12.2022 रोजी 16.30 वा. सु. मंगरुळ शिवारातील शेतात होते. यावेळी भाऊबंद- प्रदिप रितापुरे यांसह गावातील नातेवाईक- सुनिता व शिवाजी माने, लक्ष्मीबाई माने यांनी शेतजमीनीच्या वाटणीवरुन मधूकर यांच्यासोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सध्या तुमच्या मागणीप्रमाणे वाटणी शक्य नसल्याचे मधुकर यांनी त्यांना सांगून समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मधुकर यांना लाथाबुक्क्यांनी, कोयता, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मधुकर रितापुरे यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web