उस्मानाबाद जिल्ह्यात पाच अपघातात दोन ठार, तीन जखमी 

 
crime

तुळजापूर  : चालक- रसरुल्ला गफार खान, रा. नागपुर यांनी दि. 30 मे रोजी 23.30 वा. सु. सिंदफळ शिवारातील लातुर त्रिकुट रस्त्यावर मिनी ट्रक क्र. एम.एच. 40 बीजी 9807 हा निष्काळजीपने चालवल्याने संदीप कांबीलाल रासकर, रा. उस्मानाबाद हे चालवत असलेल्या रुग्णवाहीका क्र. एम.एच. 25 एजे 3463 ला समोरुन धडकला. या अपघातात रुग्णवाहीकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या संदीप रासकर यांनी दि. 31 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : चालक- योगेश अभिमन्यु भोसले, रा. उस्मानाबाद यांनी दि. 31 मे रोजी 17.45 वा. सु. पारगाव टोलनाक्यापुढे मांजरा नदीच्या पुलावर एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 2707 ही निष्काळजीपने चुकीच्या दिशेने चालवल्याने समोरुन येणाऱ्या ट्रक व वॅगनआर कार क्र. एम.एच. 46 एन 7086 ला धडकली. या अपघातात बस चालक स्वत: जखमी होउन तीन्ही वाहनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या ट्रक चालक- शैतानराम रुगनाथराम, रा. खारा, ता. छांचोर, जि. जालोर, राज्य- राजस्थान यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : कोळेवाडी, ता. उमरगा येथील भास्कर साधु कावाळे यांसोबत विजयकुमार पाटील, वय 55 वर्षे, रा. केसरजवळगा हे दि. 22 मे रोजी 18.30 वा. सु. बेळंब शिवारातील रस्त्याने बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएक्स 1118 ने प्रवास करत होते. दरम्यान भास्कर कावाळे यांनी बुलेट मो.सा. निष्काळजीपने चालवल्याने ती रस्त्यावरील खड्ड्यातून गेल्याने विजयकुमार हे खालीपडून त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने ते वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- अनुसया पाटील यांनी दि. 31 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : चालक- सतिश डिगंबर करके यांनी दि. 20 एप्रील रोजी 16.00 वा. सु. तुरोरी येथील उड्डानपुलाजवळ ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एडब्ल्यु 1051 हा निष्काळजीपने चालवल्याने रतन माधव सुर्यवंशी, वय 43 वर्षे, रा. माडज हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 14 एडी 2374 ला समोरुन धडकला. या अपघातात रतन सुर्यवंशी हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या रतन यांचा भाचा- संजय राम कांबळे, रा. आष्टा (ज.) यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 23 / 2022 फौजदारी प्रक्रीया संहिता कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत स्वप्नील शिवाजी बिराजदार, रा. मुळज, ता. उमरगा हे दि. 27 मे रोजी 12.30 वा. सु. त्रिकोळी चौरस्ता येथील रस्त्याने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 2805 ही निष्काळजीपने चालवल्याने स्वप्नील यांना पाठीमागून धडकल्याने त्यांच्या डात्या पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या स्वप्नील यांनी दि. 31 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web