उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात दोन ठार, सहा जखमी 

 
crime

वाशी  : पारगाव, ता. वाशी ग्रामस्थ- विनायक फकीरा मोठे, वय 60 वर्षे हे दि. 17.04.2022 रोजी 11.30 वा. सु. गाव शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन प्रवास करत होते. यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत विनायक मोठे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता संबंधीत वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या तानाजी उदय जगताप, रा. वाशी यांनी दि. 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- े279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : जवळे (दु.), ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- श्रीधर बाबुराव जाधव, वय 56 पर्षे हे दि. 29.03.2022 रोजी 18.00 वा. सु. खेड पाटी येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एडी 3935 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने पिकअप क्र. एम.एच. 45 टी 1119 हा निष्काळजीपने चालवल्याने श्रीधर यांच्या मो.सा. ला समोरुन धडकल्याने श्रीधर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या हरिष श्रीधर जाधव यांनी दि. 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सुर्डी, ता. उस्मानाबाद येथील सागर भिमराव चोपाटे हे दि. 17.04.2022 रोजी 16.30 वा. सु. उस्मानाबाद येथील वैराग रोडने कार क्र. एम.एच. 12 एचव्ही 3496 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 14 सीएक्स 8341 ही विरुध्द दिशेने निष्काळजीपने चालवल्याने सागर यांच्या कारला धडकली. या अपघातात सागर यांसह त्यांच्या कारमधील बुबा नायगुडे हे गंभीर जखमी होउन कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या सागर चोपाटे यांनी दि. 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : धानोरा (ब्रु.), ता. अंबेजोगाई येथील लालासाहेब वसंत काळुंके हे दि. 23.04.2022 रोजी 12.10 वा. सु. हंगरगा शिवारातील रस्त्याने ट्रक क्र. एम.एच. 26 एच 8390 हा ऊसाने भरलेला ट्रक चालवत जात होते. यावेळी चालक- वैभव सर्जेराव जाधव, रा. धुसाळे, ता. पाठण, जि. सातारा यांनी अर्टीगा कार क्र. एम.एच. 48 बीएम 7524 ही निष्काळजीपने चालवल्याने ती लालासाहेब यांच्या ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात वैभव यांसह तीन प्रवासी गंभीर जखमी होउन ट्रकचे व कारचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या लालासाहेब काळुंके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web