उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठार , सात जखमी 

 
crime

नळदुर्ग  : उमरपारुल पालापुल, आंध्द्रप्रदेश येथील जोगेश्वरराव महेशराव पिडगु यांनी दि. 16 मे रोजी 06.00 वा. सु. बसवंतवाडी शिवारातील रस्त्यावर इरटीगा कार क्र. ए.पी. 37 बीएक्स 4689 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याबाजूच्या झाडावर जाउन धडकली. या अपघातात कारमधील उमरपारुल येथील प्रवसी- राधा अप्पाराव बुकारी, वय 61 वर्षे या मयत होउन मोहित लक्ष्मी नागासाई पाडला, दुर्गादेवी अप्पीकटला, श्रीदेवी बुकारी, यशवंत अप्पीकटला व अन्य दोन व्यक्ती किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मोहीत पाडला यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर येथील वामन पांडुरंग नन्नवरे, वय 80 वर्षे हे दि. 17 मे रोजी 17.30 वा. सु. गाव शिवारातील जानकी ढाब्याजवळील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 12 जीएफ 6489 ही निष्काळजीपने चालवल्याने वामन नन्नवरे यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- उमेश वामन नन्नवरे यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web