उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी 

 
crime

नळदुर्ग  : किलज, ता.तुळजापुर येथील- शिवराज महादेव शेळके यांसोबत गावकरी रविचंद्र शिवाजी गायकवाड वय-38 वर्षे हे दि.18.12.2022 रोजी 18.30 वा. सु. मारखोरी तांडा शिवारातील किलज ते चिकुंद्रा रस्त्याने मोटरसायकल क्र एम.एच.25 ए.व्ही 8164 ने प्रवास करत होते. दरम्यान शिवराज शेळके यांनी मोटरसायकल भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने ती रस्त्याबाजूच्या दगडास धडकली. या अपघातात रविचंद्र हे मो.सा. वरुन खाली पडून गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या शिवाजी अंबादास गायकवाड रा.किलज यांनी दि. 01.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : अंबेहोळ, ता. उस्मानाबाद येथील- बालाजी बाबुराव आवड यांचे भाउ-  गोवर्धन बाबुराव आवड, वय 43 वर्षे हे दि. 17.12.2022 रोजी 10.00 वा. सु. मोटरसायकल क्र एम.एच.25 झेड 1573 वर बसून झरेगाव येथे कामाला जात होते. दरम्यान अंबेहोळ शिवारातील लक्ष्मण गवळी यांचे शेताजवळील रस्त्यावर अंबेहोळ ग्रामस्थ- फिरोज शब्बीर पठाण यांनी मोटरसायकल क्र एम.एच.25 ए 1137 ही निष्काळजीपने चालवल्याने गोवर्धन चालवत असलेल्या मो.सा. समोरुन धडकली. या अपघातात गोवर्धन हे गंभीर जखमी होउन मयत होउन तर फिरोज हे सुध्दा जखमी झाले. अशा मजकुराच्या बालाजी आवड यांनी दि.01.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337,338, 304 (अ), सह मो.वा.का. कलम-  184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web