उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी 

 
crime

उस्मानाबाद  : चालक- रमेश मदनलाल चंद, रा. भरतपुरीया, ता. इखलेरा, जि. झालावाड, राज्य- राजस्थान हे दि. 24.09.2022 रोजी 07.00 वा. सु. उस्मानाबाद ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन ट्रक क्र. आर.जे. 20 सीसी 2466 ही चालवत जात होते. दरम्यान ट्रकच्या टाकीतील इंधन संपल्याने रमेश चंद यांनी ट्रक हरियाणा मेवात ढाब्याजवळ महामार्गालगत उभा केला. यावेळी विक्रमसिंग किसनसिंग चौहान, रा. बिकानेर, राज्य- राजस्थान यांनी ट्रक क्र. आर. जे. जीडी 1383 हा निष्काळजीपने चालवल्याने रमेश चंद यांच्या नमूद ट्रकला पाठीमागून धडकला. या अपघातात चंद यांचा ट्रकमधील सहायक विक्रमसिंह अभसिंह राठोड, वय 26 वर्षे, रा. भलोरी, ता. कोलायत, जि. बिकानेर, राज्य- राजस्थान हे गंभीर जखमी होउन मयत झाला. अशा मजकुराच्यो रमेशे चंद यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण   : ढोराळा, ता. कळंब येथील- रमेश कालीदास जोगदंड हे दि. 06.09.2022 रोजी 15.30 वा. सु. हासेगाव शिवारातील शिंदेवाडी फाटा येथील रस्ता वळणावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 7759 ही चालवत जात होते. दरम्यान ग्रामस्थ- सचिन अशोक कोंडकर यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एवाय 2383 ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने रमेश जोगदंड चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला मसोरुन धडकली. या अपघातात रमेश जोगदंड हे मयत होउन सचिन कोंडकर हे स्वत: जखमी झाले. अशा मजकुराच्या रमेश यांची पत्नी- गोदावरी जोगदंड यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web