उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी 

 
crime

मुरुम  : केसरजवळगा, ता. उमरगा येथील बिरबलसिंग जयसिंग राजपुत यांसोबत अनिकेत अनिल राजपुत हे दि. 11 मे रोजी 18.30 वा. सु. बेळंब शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. के.ए. 32 इबी 7222 ने प्रवास करत होते. यावेळी ग्रामस्थ- राजशेखर सिद्राम चिंचोरे यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. एक्यु 0257 ही निष्काळजीपने चालवल्याने बिरबलसिंग यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडकली. या अपघातात बिरबलसिंग व अनिकेत यांसह राजशेखर यांच्या मो.सा. वर पाठीमागे बसलेले शरद पाटील हे गंभीर जखमी होउन बिरबलसिंग हे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या जयसिंग विठ्ठलसिंग राजपुत यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : बुध्दभुषण जगदेव गायकवाड, रा. वाशी यांसोबत तेरखेडा येथील खंडु भागवत धावारे, वय 22 वर्षे हे दि. 08.04.2022 रोजी 20.00 वा. सु. इटकुर शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 6815 ने प्रवास करत होते. यावेळी बुध्दभुषण यांनी नमूद मो.सा. निष्काळजीपने चालवल्याने घसरून रस्त्याबाजूच्या खड्ड्यात पडली. या अपघातात खंडू धावारे हे गंभीर जखमी होउन शासकी रुग्णालय, सोलापूर येथे उपचारादरम्यान दि. 18.04.2022 रोजी मयत झाले. अशा मजकुराच्या अनैसर्गीक मृत्यु क्र. 15/2022 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत खंडू यांचे भाऊ- दत्तात्रय धावारे यांनी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web