उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

मुरूम  : येणेगुर, ता. उमरगा येथील- भागीरथी काशीनाथ धामशेट्टी, वय 60 वर्षे ह्या चैतन्य सिद्राम पांचाळ रा. येणेगुर, ता. उमरगा यांचे सोबत दि. 21.10.2022 रोजी 15.00 वा. सु. महालिंगरवाडी ते येणेगुरकडे मोटारसायकल क्र.एम.एच.12 पीपी 3036 ने प्रवास करत होत्या. यावेळी चैतन्य यांनी नमूद मोटारसायकल ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने भागीरथी ह्या खाली पडून गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या मयतेचा मुलगा- उमेश काशीनाथ धामशेट्टी रा.येणेगुर ता. उमरगा यांनी दि. 19.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : सांगवी, ता. उस्मानाबाद येथील- अगंद शिवराम क्षिरसागर  वय 45 वर्षे हे दि. 08.01.2023 रोजी 18.00 वा. सु. नळदुर्ग कडून उस्मानाबाद कडे मोटारसायकलवर येत होते. दरम्यान जलशुध्दीकरण केंद्राजवळ पॉलटेक्निक कॉलेज समोर रोडवर अज्ञात चालकाने त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एम.एच.24 बीएम 7152 ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने अगंद यांना पाठीमागून धडकल्याने अगंद हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे भाउ- रंगनाथ शिवराम क्षिरसागर यांनी दि. 19.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184,134 (अ)(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 परंडा  : वडीलासुरा, ता. अंबड  येथील- दिपक साहेबराव खंडेभराड यांनी दि.19.01.2023 रोजी 21.40 वा.सु. मोटारसायकल क्र.एम.एच.20 जीएफ 0056 ही परंडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : दत्तनगर, ढोकी  येथील शुभम बालाजी परदेशी यांनी दि.19.01.2023 रोजी 22.15 वा.सु. मोटारसायकल क्र.एम.एच.25 बी 485 ही ढोकी येथील पेट्रोल पंप चौक येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

                                                

From around the web