उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

उस्मानाबाद : वरवंटी, ता. उस्मानाबाद येथील- ज्ञानेश्वर विजय पवार यांनी दि. 11.06.2022 रोजी उस्मानाबाद येथील अभियांतत्रिकी महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 9472 ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या- सुग्रबी गफुर बागवान, वय 75 वर्षे यांना पाठीमागून धडकली. या अपघातात सुग्रबी या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या मयतेचे जावई- आशपाक ईलाही बागवान, रा. उस्मानाबाद यांनी दि. 23.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : होडू, ता. गुडमालानी, जि. बाडमेर, राज्य- राजस्थान येथील- डेमा पुनमा राय यांनी दि. 21.09.2022 रोजी 23.30 वा. सु. आपला कंटेनर क्र. एम.एच. 01 एल 6451 हा नादुरुस्त झाल्याने येणेगुर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर पार्कीग लाईट तसेच कुठलेही सिग्नल न लावता उभा केला. यामुळे पाठीमागून आलेला कंटेनर क्र. एम.एच. 12 एचडी 6745 हा त्या कंटेनरला धडकल्याने या अपघातात धडकलेल्या कंटेनरचे चालक- चंद्रकांत छबिलाल गुजर, वय 60 वर्षे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या चंद्रकांत गुजर यांचे सहायक भरत अशोक गुजर, रा. नाशिक यांनी दि. 23.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मोटार वाहन कायदा कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 ढोकी  : खामसवाडी ग्रामस्थ- रविंद्र दगडु चौरे व ढोकी ग्रामस्थ- विकाय शिवाजी परदेशी या दोघांनी दि. 23.09.2022 रोजी 20.15 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकातील तेर रस्त्यामध्ये अनुक्रमे ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 42 एक्यु 6280 व मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 6462 ही वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन ढोकी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- अमोल गोडगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web