उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

उमरगा : चालक- सुधाकर बिराजदार यांनी दि. 18 मे रोजी 22.30 वा. सु. उमरगा येथील पर्यायी रस्त्याने क्लुजर वाहन क्र. एम.एच. 25 आर 3282 हे निष्काळजीपने चालवल्याने सुग्राव मोतीराम नागनबोणे, वय 55 वर्षे, रा. वाघदरी, ता. उमरगा हे चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागुन धडकले. या अपघातात सुग्रीव नागनबोणे यांसह त्यांच्या पाठीमागे बसलेल्या सुकशाबाई एकनाथ बोरुळे, वय 50 वर्षे या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या नेताजी सुग्रीव नागनबोणे, रा. वाघदरी यांनी दि. 30 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : बोरगांव (बु.), ता. कळंब येथील अक्षय बाळासाहेब खांडेकर, वय 25 वर्षे हे दि. 24 मे रोजी 13.00 वा. सु. तडवळे (क.) शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 9545 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 25 पी 5663 हा निष्काळजीपने चालवल्याने अक्षय यांच्या मो.सा. ला समोरुन धडकल्याने अक्षय खांडेकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद रीक्षाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या रामराव खांडेकर, रा. बोरगाव (बु.) यांनी दि. 30 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304(अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web