उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार
तुळजापूर : नळदुर्ग रोड, तुळजापूर येथील शहेबाज गयाज सिद्दीकी हे दि. 18.04.2022 रोजी 19.30 वा. सु. तुळजापूर येथील नळदुर्ग रस्त्याकडेने पायी जात होते. यावेळी एका मोटारसायकलने त्यांना पाठीमागून दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात मोटारसायकलचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- तमीम सिद्दीकी यांनी दि. 20 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : काळेगाव (घाट), ता. केज येथील सिध्देश्वर पोपट कोठावळे यांच्या सोबत अजय तुकाराम आगे, वय 34 वर्षे हे दि. 15.04.2022 रोजी 21.45 वा. सु. भाटसांगवी पाटी येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 44 वाय 4176 ने प्रवास करत होते. दरम्यान सिध्देश्वर कोठावळे यांनी नमूद मोटारसायकल ही निष्काळीजीपने चालवल्याने ती रस्त्याबाजूच्या खड्ड्यात धडकली. या अपघातात मो.सा. वर पाठीमागे बसलेले अजय आगे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- आरती अजय आगे यांनी दि. 20 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 20 एप्रील रोजी कारवाया केल्या. यात धनोज बनसोडे, रजनीकांत जाधव, विकी शेळके, नागेश बनसोडे या चौघांनी उस्मानाबाद बस स्थानक समोरील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोहारा येथील सार्वजनिक रस्त्यावर मतीन शेख यांनी आपला ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी नमूद सर्वांविरुध्द संबंधीत पोलीसा ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
.