उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

नळदुर्ग  : पंडीत काशीनाथ कवटे रा.जळकोट हे दिनांक 18 मार्च रोजी 10.30  वाजता  घराकडे पायी चालत जात असतांना नळदुर्ग करडुन येणारे आयशर ट्रक वाहन क्रंमाक एम एच 13 आर 4492 चे चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवुन पंडीत काशीनाथ कवटे यांना जोराधी धडक दिल्याने  कवटे  हे मयत झाले.अशा मजकुराच्या बस्वणाप्पा कवटे यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 304 अ , मोवाका 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  :  दिनांक 15 मार्च रोजी  18.30 वा मोटार सायकल क्रमांक एम एच 25 एयु 0484 चे चालकाने मोसा ही भरधाव वगाने चालवुन रविकीरण उमाकांत देशमुख वय 60 वर्ष यांना जोराची धडक दिल्याने रविकीरण हे यमत झाले.अशा मजकुराच्या श्रतुराज देशमुख  यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279,337,338,304 अ , मोवाका 184 (अ)(ब) अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.


मुरूम : धार्मीक भावना दुखावणा-यावर गुन्हा दाखल 

मुरुम  :  दिनांक 17 मार्च 05.15 वा लखन कमलाकर सत्रे यांने जगदीश अशोक ओव्हाळ यांचेशी संभाषणावेळी एका राष्ट्रीय पुरुषांविषयी अपशब्द वापरुन  भावना दुखाउन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा मजकुराच्या सचिन कल्याण बनसोडे यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 295 अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

सर्वजनिक शांतता भंग करणा-यांवर गुन्हा दाखल 

परंडा  :  करमाळा येथील ग्रामस्थ मस्क्ुनाथ आडसुळ, रा.कर्जत, तुषार लांडगे हे परंडा ते सोनारी जाणारे रोडवर पिंपरखेड पाटी जवळ मोठयाने शिवीगाळ करुन सार्वजनिक शांतता भंग करताना मिळुन आलेने परंडा पोलीसांनी त्यांचेवर 85 (1) मं दा का अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

From around the web