उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार

उस्मानाबाद : रुई येथील चालक महेश देटे हे दिनांक 9 मार्च रोजी 23.40 वा डि-मार्ट समोरील महामार्गावरुन सांजा चौक ते तेरणा वाय जंक्शन असे ट्रॅक्टर-ट्रेलर क्रमांक एम एच 25 एच 3236 हा चालवत जात होते. यावेळी आयशर मिनी ट्रक क्रमांक एम एच 15 जी व्ही 3598 च्या चालकाच्या निष्क्ाळजीपणामुळे तो ट्रक देटे यांच्या ट्रेलरवर पाठीमागुन धडकला.
या अपघातात देटे यांच्या उजव्या हातासह उजव्या पायास व डोक्यास दुखापत झाली. या अपघाता नंतर देटे यांच्या ट्रॅक्टर मधील सहकारी आश्रुबा देटे, वय 20 वर्ष, हा अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करत असतांना पाठीमागुन आलेल्या ट्रक क्रमांक टी एन 88 ई 8138 च्या चालकाच्या निष्क्ाळजीपणामुळे तो ट्रक अपघातग्रस्त आयशर मिनीट्रकला धडकला. या दुस-या धडकेत आश्रुबा देटे हा दोन्ही ट्रकमध्ये दाबला जाउन मयत झाला.
उपरोक्त मजकुराच्या महेश देटे यांनी दिनांक 12 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 337, 338, 304 अ मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : उत्तर सोलापुर येथील अमोल होळकर वय 30 वर्ष हे नातेवाईक विद्या सदगर यांना मोटार सायकलवर घेउन दिनांक 12 मार्च रोजी 13.45 वा नळदुर्ग बसस्थानका समोरील महामार्गावरुन जात होते. यावेळी पाठीमागुन आलेल्या ट्रक क्रमांक एम एच 24 ए बी 0722 च्या चालकाच्या निष्क्ाळजीपणामुळे ट्रक होळकर यांच्या मोटार सायकलला पाठीमागुन धडकला. या अपघातात ट्रकचे चाक होळकर यांच्या अंगावरुन जाउन ते मयत झाले. तर विद्या सदगर या किरकोळ जखमी झाल्या. अशा मजकुराच्या विद्या यांनी दिनांक 12 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 337, 304 अ मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.