उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

बेंबळी  : कोंड, ता. उस्मानाबाद येथील नाना गंपु जाधव, वय 33 वर्षे हे दि. 16.02.2022 रोजी 12.00 वा. सु. गावातील नितळी रस्त्याकडेने पायी चालत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 24 बीबी 9917 ही निष्काळजीपने चालवल्याने नाना जाधव यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या शिल्हा नाना जाधव, रा. कोंड यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लोहारा  : भातांगळी, ता. लोहारा येथील सुरज राम पवार, वय 30 वर्षे हे दि. 27.02.2022 रोजी पहाटे 04.00 वा. सु. गावातील इंद्रजीत हजारे यांच्या शेत गट क्र. 156/3/2 मध्ये ऊस भरण्यासाठी ट्रक आल्याने सुरज पवार हे ट्रक क्र. एम.एच. 24 जे 8407 च्या बाजूचे पडलेले ऊस गोळा करत होते. यावेळी नमूद ट्रक चालक- चंद्रकांत माणिकराव शिंदे, रा. लातुर यांनी निष्काळजीपने चालवल्याने ट्रकसमोरील ऊस गोळा करणारे सुरज पवार यांना धडकला. या अपघातात सुरज पवार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- अनंत राम पवार यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या 3 चालकांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : सचिन देडे, रा. मुरुम यांनी दि. 02.03.2022 रोजी मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर तर योगेश हेडे, रा. सुंदरवाडी यांनी सुंदरवाडी फाटा येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभे केले. तसेच नामदेव बनसोडे, रा. लातुर यांनी दि. 02.03.2022 रोजी उस्मानाबाद बस स्थानकसमोरील रस्त्यावर त्यांच्या ताब्यातील खाजगी बस रहदारीस धोकादायकरित्या उभी केली.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web