उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, चार जखमी 

 
crime

तुळजापूर  : बैंसा, जि. अदिलाबाद, राज्य- आंध्रप्रदेश येथील- अभिषेक यशवंत मोरे हे दि. 08.01.2023 रोजी 04.30 ते 05.00 वा. दरम्यान काक्रंबा शिवारातील उड्डानपुलाजवळील रस्त्याने कार क्र. टी.एस. 18 डी 1910 ही चालवत जात होते. यावेळी अभिषेक यांनी नमूद कार ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रित होउन रस्त्याबाजूच्या नालीत जाउन धडकली. 

या अपघातात अभिषेक मोरे हे स्वत: मयत होउन कारमधील त्यांचे गावातील अन्य प्रवासी- राजेश्वर शंकर भुमनेरुल्ला, विशाल मदनकार, साईकिरण जेरीवाडा, राजु गुंजेवाड हे सर्वजण गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या राजेश्वर भुमनेरुल्ला यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 08.01.2023 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब  : बाभळगाव, ता. कळंब येथील- अंबरूषी संदीपान कांबळे व त्यांचे पिता- संदीपान किसन कांबळे वय 56 वर्षे हे दोघे दि.13.11.2022 रोजी 13.30 वा.सु. कन्हेरवाडी शिवारातील महामार्गावरुन मोटरसायकल क्र. एम.एच. 25 एएच 0487 वरुन प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 22 एआर 1335 ही निष्काळजीपने चालवल्याने अंबरूषी कांबळे चालवत असलेल्या नमूद मोटरसायकलला पाठीमागून धडकल्याने संदीपान किसन हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अंबरूषी  कांबळे यांनी दि.08.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

वाशी  : केळेवाडी, ता. वाशी  येथील- दिलीप चोथवे यांनी दि. 08.01.2023 रोजी 18.05 आपल्या ताब्यातील टमटम. क्र.एम.एच. 23 एएन 1922 हा वाशी तहसील कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर तर तांदुळवाडी, ता. वाशी येथील- किसन गायकवाड यांनी टमटम क्र.एम.एच. 12 टीयु 7023 हा याच दिवशी 18.50 वा. सु. वाशी आठवडा बाजार येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द वाशी पो.ठा. येथे स्वतंत्र 02 गुन्हे नोंदवले आहे.

From around the web