उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, चार जखमी 

 
crime

ढोकी - अज्ञात चालकाने दि. 29.05.2022 रोजी 19.00 वा. सु. तेर- हिंगळजवाडी रस्त्यावर क्रुझर वाहन क्र. एम.एच. 24 एएस 6164 हे निष्काळजीपने चालवल्याने समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 1587 ला समोरुन धडकले. या अपघातात मो.सा. चालक- विशाल राजेंद्र पवार, रा. भंडारवाडी हे जखमी होउन त्यांच्या पाठीमागे बसलेल्या चुनाबाई सिद्राम शिंदे, रा. बुक्कनवाडी, ता. उस्मानाबाद या मयत झाल्या. अशा मजकुराच्या विशाल पवार यांनी दि. 12 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा -  चालक- इक्बाल सिध्दीक सुमारा, रा. गुजरात यांनी दि. 10 जून रोजी 22.00 वा. सु. बलसुर येथील रस्त्यावर ट्रक क्र. जी.जे. 10 टिएक्स 9990 हा निष्काळजीपने चालवल्याने ट्रकचा सहायक- धिरजलाल पोपटलाल चौहान, वय 35 वषे्र, रा. गुजराज हे धावत्या ट्रकमधून खाली पडून त्यांच्या अंगावरुन ट्रकचे मागील चाक जाउन ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या शरद शहाजी सास्तुरे, रा. कडदोरा, ता. उमरगा यांनी दि. 12 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

तुळजापूर  : प्रकाश खोपडे, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर व चंद्रसेन भोजणे, रा. तुळजापूर हे दोघे दि. 12 जून रोजी 20.35 वा. सु. तुळजापूर येथील जुने बस स्थानक समोरील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवत असताना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मोटार वाहन कायदा कलम- 185 अंतर्गत स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web