उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात दोन ठार, चार जखमी 

 
Osmanabad police

वाशी  : पिंपळवाडी, ता. वाशी येथील ज्ञानेश्वर भारत पवार यांनी दि. 16.02.2022 रोजी 21.00 वा. सु. पिंपळवाडी फाटा येथील रस्त्यावर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 9943 हा निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणाने गावकरी- यशोधन प्रकाश ढेंगळे, वय 19 वर्षे व विजयकुमार शिवाजी ढेंगळे या दोघांना समोरुन धडकला. या अपघातात यशोधन ढेंगळे हे मयत झाले असून विजयकुमार हे जखमी झाले. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टर चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या विजयकुमार ढेंगळे यांनी दि. 21.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना येथील अर्जुन नाना धुमाळ, वय 60 वर्षे व शोभा धुमाळ हे दोघे पती- पत्नी दि. 20.02.2022 रोजी 17.00 वा. सु. पारगाव शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 21 बीजे 1263 ने प्रवास कत होते. यावेळी अज्ञात चालकाने पिकअप वाहन क्र. एम.एच. 16 सीसी 8114 हा निष्काळजीपने चालवल्याने अर्जुन धुमाळ चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून धडकला. या अपघातात अर्जुन धुमाळ हे मयत झाले तर त्यांच्या पत्नी- शोभा या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर नमूद पिकअपचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या गोकुळ बापुराव चाटे, रा. पारगाव, ता. वाशी यांनी दि. 21.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : सांजा रोड, उस्मानाबाद येथील विजय दयानंद वाघमारे, वय 23 वर्षे हे दि. 29.02.2022 रोजी 02.30 वा. सु. सांजा चौकातील रस्त्याकडेने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने इनोव्हा कार क्र. एम.एच. 25 आर 6644 ही निष्काळजीपने चालवल्याने समोरील वाहनास ओव्हरटेक रण्याच्या पयत्नात विजय वाघमारे यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- दयानंद दामोदर वाघमारे यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 9 / 2022 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दि. 21.02.2022 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web