उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार , १२ जखमी 

 
crime

तुळजापुर  : चालक- ईश्वर राजाभाई मोरी, रा. वसई, जि. जामनगर, राज्य- गुजरात यांनी दि. 03.05.2022 रोजी 10.30 वा. सु. तुळजापूर येथील लातूर पर्यायी मार्गावरील चौकात ट्रक क्र. जी.जे. 36 व्ही 9628 हा निष्काळजीपने चालवल्याने बाबा सीताराम राठोड, रा. पुसत, जि. यवतमाळ हे चालवत असलेल्या गाडीला डाव्या बाजूने धडकला. या अपघातात गाडीमधील अमरसिंग तारासिंग राठोड, वय 58 वर्षे, रा. पुसद हे मयत झाले तर अनय्‍ 10 प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या बाबा राठोड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : आकाश वैजनाथ खरटकर, रा. हासेगाव, ता. कळंब यांसोबत त्यांची बहिण- सिमा दत्तात्रय तोडकरी, वय 31 वर्षे, रा. येरमाळा असे दि. 02.05.2022 रोजी 16.45 वा. सु. गावातील कळंब रस्त्यावरील वळणावर मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी एका ट्रॅक्टरने आकाश चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन दिलेल्या धडकेत सिमा तोडकरी व आकाश खरटकर हे दोघे गंभीर जखमी होउन सिमा या वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या वैजनाथ रामलिंग खरटकर यांनी दि. 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हुंडबळी 

ढोकी  : जागजी, ता. उस्मानाबाद येथील श्रीमती पल्लवी गुंडीबा शिंदे, वय 25 वर्षे यांनी दि. 2 मे रोजी जागजी येथे गळफास घेउन आत्महत्या केली. गाडी घेण्यासाठी पल्लवी यांनी माहेरहून 2 लाख रुपये आणावेत यासाठी  सासरकडील- 1) गुंडीबा व्यंकट शिंदे (पती) 2) कुसुम शिंदे, रा. कुंभेफळ, ता. अंबेजोगाई 3) जयश्री मगर, रा. जागजी 4) भाग्यश्री उपडे, रा. बिटरगांव 5) अश्विनी मगर, रा. नायगांव 6) बालिका उपाळे, रा. पळशी, ता. लातुर यांनी चार महिन्यांपासून पल्लवी यांचा शारिरीक- मानसिक छळ केला. या छळास कंटाळून पल्लवी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या चंद्रकांत शंकर देडे, रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर (ह.मु. उस्मानाबाद) यांनी दि. 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (ब), 306, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web