उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन जखमी 

 
crime

उमरगा : नाईचाकुर, ता. उमरगा येथील शाहरुख लालु पठाण, वय 24 वर्षे हे दि. 09 मे रोजी 07.30 वा. सु. नारंगवाडी शिवारातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. के.ए. 32 सी 5404 हा निष्काळजीपने चालवल्याने शाहरुख यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शाहरुख पठाण यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : डिगुळअंबा, ता. अंबेजोगाई, जि. बीड येथील नागुराव भिवा उमाप, वय 75 वर्षे हे दि. 17 एप्रील रोजी 20.15 वा. सु. येडशी टोलनाक्याजवळ थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 25 एजे 0040 हे निष्काळजीपने चालवल्याने नागुराव उमाप यांना पाठीमागून धडकले. या अपघाता उमाप यांच्या दोन्ही गुडघ्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या नागुराव उमाप यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 हयगईने मृत्यूस कारणीभूत, गुन्हा दाखल

उस्मानाबाद : समतानगर येथील तारेख मुनिख शेख हा 14 वर्षीय मुलगा दि. 15 मे रोजी 14.15 ते 16.15 वा. दरम्यान समतानगर, उस्मानाबाद येथील ‘ब्लु कॉन स्विमींग पुल’ येथे पोहतांना बुडल्याने तेथील तैनात असलेला जीवन रक्षक, प्रशिक्षक यांनी तारेख यास बुडतांना बाहेर काढण्यास हलगर्जीपणा केल्याने तो मयत झाला. अशा मजकुराच्या तारेखचे पिता- मुनिब महंमद हाफिज शेख यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवलाआहे.

From around the web