उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन जखमी 

 
crime

उस्मानाबाद  : शिवजी, ता. औसा येथील राजु शंकर सुरवसे, वय 30 वर्षे हे दि. 17 मे रोजी 10.30 वा. सु. गणेशनगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 ने मोटारसायकल क्र. एम.एच. 12 आरजी 5098 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 25 पी 0428 हे निष्काळजीपने चालवल्याने सुरवसे यांच्या मो.सा. ला समोरुन धडकले. या अपघातात सुरवसे यांच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या राजु सुरवसे यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : नंदकुमार गोविंद डेंगे, रा. सोलापूर यांनी दि. 26 एप्रील रोजी 18.00 वा. सु. कराळी येथील महामार्गावर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीडब्ल्यु 7234 ही निष्काळजीपने चालवल्याने अनिल ज्ञानेश्वर बोयणे, रा. हंद्राळ (वाणी), ता. उमरगा हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 6030 ला पाठीमागून धडकल्याने बोयणे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अनिल बोयणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल 

कळंब  : कळंब शहरातील सार्वजनिक रस्त्यावर मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यांवर कळंब पोलीसांनी काल दि. 18 मे रोजी कारवाया केल्या. यात 1)गणेश जाधव 2) शुभम काळे, दोघे रा. लोहटा (प.) 3) विनायक आदमाने, रा. खडकी 4) आजमेर शेख, रा. पिंपळगाव 5) प्रशांत अंबिरकर, रा. डिकसळ 6) सुखदेव भोगवे, रा. मोहा यांनी आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पोलीस ठाण्यात स्वतंत्र 6 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web