उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
crime

उस्मानाबाद  : राघुचीवाडी, ता. उस्मानाबाद येथील सुधाकर धोंडीबा करवर हे दि. 14 जून रोजी 17.30 वा. सु. राघुचीवाडी येथील आपल्या शेतात होते. यावेळी त्यांचे शेत शेजारील भाऊबंद- सोमनाथ वसंत करवर यांसह त्यांची मुले- विनोद, व विजय यांनी सुधाकर यांच्या शेतातील माती ट्रॅक्टरचने आपल्या शेतात ओढल्याने त्याचा जाब सुधाकर यांनी विचारला असता नमूद तीघा पिता- पुत्रांनी सुधाकर यांना शिवीगाळ करुन लोखंडी रुमण्याने, दगडाने मारहार करुन त्यांना जखमी केले. तसेच सुधाकर यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या मुलास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुधाकर करवर यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: गुंजोटी, ता. उमरगा येथील भिमाशंकर शिलवंत, प्रकाश शिलवंत, इरम्मा शिलवंत या सर्वांनी सामाईक जागेवरील बांधकामाच्या कारणावरुन दि. 15 जून रोजी 11.30 वा. सु. गावकरी- धर्मवीर व कर्मवीर सिद्राम पाटील यांना गुंजोटी येथे शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याने, काठीने पायावर, पाठीवर मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धर्मवीर पाटील यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 14 जून रोजी 17.00 वा. सु. आपल्या गल्लीत असताना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

From around the web