उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
crime

मुरुम  :  नळवाडी ता.उमरगा येथील विश्वजित नेताजी जाधव हे दिनांक 24 मार्च रोजी 12.30 वा  माधवराव हायस्कुल मध्ये जात असतांना  सुरज चौधरी व त्याचा एक मित्र यांनी तु मला धक्का का मारलास अशी विचारणा करुन विश्वजित याला हंटरने डाव्या गालावर ,पोटावर, पाटीवर डाव्या खांदयावर मारुन जखमी केले व शिवीगाळ केली.अशा मजकुराच्या विश्वजित जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  :  मुरुम येथील मल्लीनाथ आण्णाप्पा देसाटे हे दिनांक 23 मार्च रोजी 19.30 वा किसान चौक येथे दुकानासमोर येउुन मागील भांडणाच्या काराणा वरुन तु मला जिवे मारताव काय असे म्हणुन शिवीगाळ करुन दिनेश उर्फ  पिंटु शंकर सत्रे  व विनोद कानीफनाथ जोगी यांनी मल्लीनाथचे  उजवे हाताचे कोपरावर रॉडने मारुन गंभीर दुखापत केली.अशा मजकुराच्या मल्लीनाथ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 326,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोका निर्माण करणा-यांवर कारवाई

लोहारा  : दिनांक 24.03.2022 रोजी सास्तुर वेशीजवळ बलसुर रोडवर येथे इम्रान तय्यब आळंदकर यांनी ॲपे तीन चाकी क्रमांक एम एच 25 ए 0829 हा तर लोहारा ते पाटोदा जाणारे रोडवर अपना हॉटेल समोर नरहरी विठठल सोनार यांनी  ॲपे तीन चाकी क्रमांक एम एच 25 एफ 1064 तसेच महमंद बाबुमियाँ शेख यांनी ॲपे तीन चाकी क्रमांक एम एच 25 एफ 1198 असे रहदारीस धोका होईल अशा प्रकारे उभा करुन भा.द.सं कलम 283 चे उल्लंघन केल्याने  लोहारा पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

From around the web