उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
crime

बेंबळी  : तोरंबा येथील बाळासाहेब गायकवाड यांच्या शेतातील बांध व आब्यांचे झाड  गावकरी बाबुराव जाधव, प्रकाश जाधव, अश्वीनी जाधव, अनिकेत पवार, संगिता पवार यांनी नांगराने उध्वस्त्‍ केले.याचा जाब  बाळासाहेब यांसह त्यांची पत्नी मुक्ताबाई यांनी दिनांक 06.03.2022 रोजी 20.30 वा नमुद लोकांना विचारला यावर चिडुन जावुन नमुद सर्वांनी गायकवाड पती पत्नीस काठीने गजाने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादंस 143, 147, 148, 149,324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : भुम येथील गणेश वेदपाठक यांच्या मुलाकडुन उधार पैसे परत मागण्याच्या कारणा वरुन  गावकरी चेतन, माउली, सौरभ शाळु यांसह सुमीत टकले, सोमनाथ टकले, रोहन खामकर, अक्षय घोडके यांसह अनिल सगरे यांनी दिनांक 03 मार्च रोजी 18.00 वा गणेश वेदपाठक यांना गांधी चौकात मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादंस 143, 147, 148, 149,324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी 

तुळजापूर  : जिजामाता नगरातील वर्षा यादव यांसह शेजारच्या  शोभा पेंदे या दोघांच्या बंद घराचे दरवाज्याचे कुलुप दिनांक 06 ते 07 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील एकुण 72,500- रुपये रोख रक्कम व 15 ग्रॅम सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या वर्षा यादव यांनी दि. 07.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web