उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
crime

तुळजापूर  : घाटशिल रोड, तुळजापूर येथील नृसिंह भालचंद्र जाधव, रामराजु जाधव, वैभव जाधव, ओमकार जाधव, प्रकाश पुणेकर, मंगलबाई जाधव, वंदना जाधव, संजा पुणेकर या सर्वांनी जुन्या वादावरुन दि. 23.02.2022 रोजी 08.00 वा. सु. गल्लीतीलच मनिषा हरिदास झोंबाडे यांसह त्यांची भावजय यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनिषा झोंबाडे यांनी दि. 24.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतग्रत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : पानगाव, ता. कळंब येथील अंकुश रामभाऊ घुंबर हे पत्नी, मुलासह दि. 22.02.2022 रोजी 16.00 वा. सु. पानगाव गट क्र. 57 मधील शेत बांधावरुन मोटारसायकलने जात होते. यावेळी बांधवरील पाण्याचा नळ फुटून चिखल झाल्याने त्यांची मोसा घसरल्याने त्यांनी शेजारील शेतकरी- बालाजी बाराते यांना फुटलेला नळ दुरुस्ती संदर्भात विचारणा केली असता बालाजी यांसह साईश्वर बाराते, लक्ष्मण बाराते, वैशाली बाराते, अनिता बाराते, दगडुबाई बाराते या सर्वांनी अंकुश यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले. यावेळी अंकुश यांच्या बचावास आलेली त्यांची पत्नी व मुलासही चापटाने मारहान करुन ढकलून दिले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अंकुश घुंबर यांनी दि. 24.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवले आहेत.

फसवणूक

परंडा  : बिटरगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथील भिकु जमला राठोड यांनी दि. 21.11.2021 रोजी 10.00 वा. सु. वाणेगवपहण, ता. परंडा येथील धनंजय श्रीमंत जाधव यांच्याकडून ऊस तोडणीसाठी मजुर पुरविण्याचा करार करुन त्यापोटी भिकु राठोड यांनी 7,00,000 ₹ रक्कम उचल उचलली होती. भिकु राठोड यांनी एकही मजुर पुरवठा न करुन तसेच घेतलेली रक्कमही परत नकरता जाधव यांची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या धनंजय जाधव यांनी दि. 24.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web