उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

उमरगा : व्हंताळ, ता. उमरगा येथील अमोल बालाजी सुरवसे यांनी जुन्या वादावरुन दि. 14.02.2022 रोजी 21.30 वा. सु. गावातील मारुती मंदीराच्या ओट्यावर गावकरी- मिटु विकास जाधव यांना कत्तीने डोक्यात वार करुन त्यांना जखमी केले. यावेळी मिटु यांच्या बचावास आलेला त्यांचा भाऊ- बबलू जाधव यांसही अमोल यांसह सुजित सुरवसे, बालाजी सुरवसे, उर्मिला सुरवसे या सर्वांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिटु जाधव यांनी दि. 15 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
ढोकी  : तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथील किशोर दिगंबर कदम यांनी गावातील नाली खोदकामासंदर्भात ग्रामपंचायतीस वेळोवेळी अर्ज केले होते. या कारणावरुन गावकरी- परशुराम कोरडे, बाळू कोरडे, दिपक देशमुख, प्रदिप शिंदे, निर्मला कोरडे, संगीता शिंदे या सर्वांनी दि. 13.02.2022 रोजी 15.00 वा. सु. गावात किशोर कदम यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच यावेळी परशुराम व बाळू यांनी गमजामध्ये दगड बांधून किशार यांना त्या दगडाने तर दिपक यांनी लोखंडी गजाने मारहान करुन किशोर यांना जखमी केले. यावेळी किशोर यांच्या बचावास आलेले त्यांचे पिता- दिगंबर यांसही नमूद लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या किशोर कमद यांनी दि. 15 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एका गावातील एक 13 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 11.02.2022 रोजी 17.30 वा. सु. गल्लीत एकटी असल्याची संधी साधून नात्यातील दोघा तरुणांनी तीच्याजवळ जाउन, “ तु मला लय आवडतेस.” असे म्हणून तीला मिठी मारुन व भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्र काढुन तीचा विनयभंग केला. तसेच सदर प्रकारची वाच्यता केल्यास त्या दोघांनी तीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी ते छायाचित्र फेसबुक या प्रसार माध्यमावर प्रसारीत करुन पुन्हा तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 15 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 506, 34 आणि पोक्सो कायदा कलम- 8, 12 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66, 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web