उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना
येरमाळा : पुण्याहुन उस्मानाबाद कडे येणा-या एका खाजगी प्रवासी बसची डिकी दिनांक 07-8 मार्च दरम्यानच्या रात्री गौर शिवारात अज्ञात व्यक्तीने फोडुन उघडुन आतील पोते, बॅग असे 97,000 रुपये किमतीचे सामान चोरुन नेले.अशा मजकुराच्या सोनाबाई शिंदे रा.गौर यांनी दि. 08.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : काक्रंबा येथील संभाजी साबळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा दिनांक 07-8 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने वाकवुन घरातील लोखंडी पेटी उचकटुन आतील 44 ग्रॅम सुवर्ण दागिने, 80,000 रुपये रक्कम व 5 नवीन साड्या चोरुन नेल्या.अशा मजकुराच्या संभाजी साबळे यांनी दि. 08.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद : अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 08.03.2022 रोजी 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. या छाप्यादरम्यान 3 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1) कोथळी येथे शेत बांधावर सदानंद जमादार हे 13 बाटल्या विदेशी दारु बाळगलेले मुरुम पोलीस ठाणे पथकास आढळले.
2) सांगवी काटी येथे तोळाबाई शिंदे या 15 बाटल्या विदेशी दारु बाळगलेले तामलवाडी पोलीस ठाणे पथकास आढळले.
3) नांदगाव येथे मल्लेश लामजने हे देशी विदेशीच्या 15 बाटल्या विदेशी दारु बाळगलेले नळदुर्ग पोलीस ठाणे पथकास आढळले.