उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
crime

उस्मानाबाद : सारोळा (बु.), ता. उस्मानाबाद येथील राहुल कल्याण रणदिवे यांनी त्यांच्या शेत गोठ्यात ठेवलेली एक म्हैस दि. 27- 28.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राहुल रणदिवे यांनी दि. 01.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : बोरामणी, ता. सोलापूर (द.) येथील मल्लीकार्जुन भिमराव गाडेकर यांच्या खडकी शिवारातील शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा लक्ष्मी पाणबुडी विद्युत पंप दि. 25- 26.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या मल्लीकार्जुन गाडेकर यांनी दि. 01.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात

उमरगा  : दावतपुर, ता. औसा येथील शैलेश हरिश्चंद्र बिराजदार, प्रशांत दिगंबर दाने व बस्वराज बालाजी लांडगे हे तीघे दि. 25.02.2022 रोजी 11.00 वा. सु. एकुरगावाडी येथील पुलावरील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 42 के 9969 ही निष्काळजीपने चालवल्याने नमूद तीघे प्रवास करत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडकल्याने मोसासह ते तीघे पुलाखाली पडले. या अपघातात बस्वराज लांडगे हे मयत झाले तर शैलेश बिराजदार व प्रशांत दाने हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या शैलेश बिराजदार यांनी दि. 01.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web