उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

ढोकी : ईर्ला, ता. उस्मानाबाद येथील सुशांत बालाजी क्षिरसागर यांनी आपल्या गट क्र. 59 मधील शेत गोठ्यासमोर ठेवलेली गवळावू जातीची एक म्हैस दि. 11- 12.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुशांत क्षिरसागर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : उमरगा येथील मनिषा रमेश पवार, वय 47 वर्षे या आपला मुलगा- पवन यासह दि. 11.02.2022 रोजी 11.00 ते 16.10 वा. दरम्यान उमरगा – उस्मानाबाद – अंदोरा असा प्रवास एसटी बस व खाजगी वाहनाने करत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने मनिषा पवार यांच्या पिशवीची चैन त्यांच्या नकळत उघडून आतील 107 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मनिषा पवार यांनी दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : दत्तनगर, उस्मानाबाद येथील दत्ता वटाणे हे दि. 12.02.2022 रोजी 14.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील एका दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 360 ₹ रक्कम बाळगले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्या विरुध्द महारष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web