उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एका गावातील एक 19 वर्षीय विवाहीत महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 02.02.2022 रोजी 12.30 वा. सु. तीच्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका पुरुषाने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्यासह तीच्या पतीस ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एक 32 वर्षीय महिला आपल्या 13 वर्षीय मुलीसह (नाव- गाव गोपनीय) माहेरी आली असतांना दि. 10.02.2022 रोजी 16.00 वा. सु. जवळच्या नात्यातील एका पुरुषाने ती मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यानंतर त्या पुरुषाने रात्री 20.00 वा. सु. पिडीतेच्या  घरी जाउन त्या मुलीसह तीच्या आईस मारहान करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेच्या आईने दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : तामलवाडी ग्रमास्थ- राजु पटेल यांनी दि. 11.02.2022 रोजी 17.30 वा. सु. तामलवाडी टोलनाका येथील राष्ट्रीय माहामार्ग क्र. 52 वर आपल्या ताब्यातील हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 0019 ही इतरांच्या जिवीतास दुखापत होईल अशा बेदरकारपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. तर लोहारा (बु.), ता. लोहारा येथील मोहसीन बागवान यांनी याच दिवशी लोहरा येथील छ. शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर आपल्या ताब्यातील फळगाडा रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोन्ही व्य्क्तीविरुध्द तामलवाडी व लोहरा पोलीस ठाण्यात गेन्हे नोंदवले आहेत.

From around the web