उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना 

 
crime

वाशी  : एका 32 वर्षीय पुरुषाने गावातीच एका 31 वर्षीय महिलेशी (नाव- गाव गोपनीय) मागील दिड वर्षापासून जवळीक साधुन त्या महिलेच्या पतीसह मुलांना ठार मारण्याची धमकी तीला देउन तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. तसेच दि. 08.09.2022 रोजी 23.00 वा. सु. ती महिला तीच्या घरी एकटी असल्याची संधी साधून त्याने तीच्यावर पुन्हा लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2) (एन), 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : एका तरुणाने शेजारील गावच्या एका 34 वर्षीय महिलेशी (नाव- गाव गोपनीय) मागील 3 महिन्यांपासून जवळीक साधुन त्या महिलेच्या मुलांना ठार मारण्याची व तीची बदनामी करण्याची धमकी त्या महिलेस देउन तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. या दरम्यान त्या महिलेस शिवीगाळ व मारहान करुन तीला ठार मारण्याची धमकी देउन तीच्याकडून वेळोवेळी एकुण 50,000 ₹ खंडणी घेतली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2) (एन), 384, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web