उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

उमरगा  : कराळी, ता. उमरगा येथील- बालाजी नागनाथ आष्टे, वय 52 वर्षे हे दि. 22.11.2022 रोजी 01.30 ते 03.00 वा. सु. आपल्या राहत्या घरात झोपलेले असताना ते झोपलेल्या शेजारच्या बंद खोलीचे कुलूप आज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन अंदाजे 1,80,000 ₹ किंमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या बालाजी आष्टे यांनी दि. 23.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : बिजनवाडी, ता. तुळजापूर येथील- आमृतराव लक्ष्मण गायकवाड, वय 35 वर्षे यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 20.11.2022 रोजी 22.00 ते दि. 21.11.2022 रोजी 02.30 वा. दरम्यान तोडून आत प्रवेश करुन कपाटात ठेवलेले 8 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 10,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 42,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या आमृतराव गायकवाड यांनी दि. 23.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक

परंडा  : खंबाळे, ता. शिरपुर, जि. धुळे येथील- भोंगी ग्यानसिंग पवार यांनी दि. 15.05.2022 रोजी 10.30 वा. सु. परंडा येथे सन- 2022-23 या हंगामासाठी 18 ऊसतोड मजून पुरवण्याचा करार कौडगाव, ता. परंडा येथील- राजेंद्र महादेव करंडे यांच्याशी करुन त्यापोटी करंडे यांच्याकडून 10,00,000 ₹ रक्कम आगावू घेतली होती. परंतु त्या कराराप्रमाणे भोंगी पवार यांनी करंडे यांना ऊसतोड मजूर आजपर्यंत न पुरवता व घेतलेले पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या राजेंद्र करंडे यांनी दि. 23.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web