उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील इलीयास आखलाफ शेख यांनी बंद असलेल्या एसआर पेट्रोलियम केंद्राच्या आवारात आपला टिपर लावला असता त्या टिपर मधील तीन चाके, एक जॉक, एक स्टेफनी असे साहित्य दि. 21- 22.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या इलीयास शेख यांनी दि. 23.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : शिराळा, ता. परंडा येथील समाधान अनिल कदम यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 5529 ही दि. 19.02.2022 रोजी 22.00 वा. सु. परंडा येथील प्रेरणा महाविद्यालयासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या समाधान कदम यांनी दि. 23.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

नळदुर्ग  : राजेशनगर पारधी पिढी, ढोकी येथील कलाप्पा राजेंद्र चव्हाण यांसह 10 व्यक्त्तींच्या गटाचा खामकरवाडी, ता. वाशी येथील आक्काबाई अन्सर काळे यांसह 14 व्यक्तींच्या गटाशी चिवरी, ता. तुळजापूर येथील महालक्ष्मी देवीच्या मंदीराच्या आवारात दि. 22.02.2022 रोजी 17.00 ते 17.30 वा. दरम्यान किरकोळ कारणावरुन हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांती स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटांतील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने चाकु, सुरी, बियरच्या बाल्या, दगड, काठीने मारहान करुन किरकोळ व गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या कलाप्पा चव्हाण व आक्काबाई काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 143, 147, 148, 149 सह मुंबई पोलीस अधिनियम कलम- 135 अंतर्गत परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

शिराढोण  : माळकरंजा, ता. कळंब येथील भास्कर मारुती कराड व लता कराड या दाघा पती- पत्नींनी सामाईक बांध फोडल्याच्या कारणावरुन दि. 19.02.2022 रोजी 14.00 वा. सु. माळकरंजा शेत शिवारात भाऊबंद- विश्वनाथ मारुती कराड यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विश्वनाथ कराड यांनी दि. 23.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web